जालना - जिल्ह्यातील गोंदेगाव शिवारात अज्ञातांनी प्रेमी युगुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ काल (गुरुवार) व्हायरल झाला होता. आज या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या ९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
'त्या' व्हिडिओप्रकरणी अखेर ९ जणांवर गुन्हा दाखल - viral video issue in jalna
जिल्ह्यातील गोंदेगाव शिवारात अज्ञातांनी प्रेमी युगुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ काल (गुरुवार) व्हायरल झाला होता. आज या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिनांक जानेवारीला दुपारी 2 वाजेच्या सुमारास देऊळगाव राजा येथील एक युवक-युवती डबा खाण्यासाठी गोंदेगाव शिवारात असलेल्या झाडीमध्ये आले होते. त्यावेळी या परिसरात जनावरे चालणाऱ्या अज्ञात ८ ते ९ जणांनी या दोघांनाही मारहाण केली. तसेच त्या युवतीचा विनयभंग केला. या प्रकरणाचा व्हिडिओ काल दिनांक 30 जानेवारीला व्हायरल झाला होता. हे गंभीर प्रकरण पाहून आज सकाळपासूनच पोलीस यंत्रणा कामाला लागली होती.
दरम्यान, पीडिता ही बुलडाणा जिल्ह्यातील असल्यामुळे जालना पोलिसांनी तिची तक्रार जाऊन आणली. आज रात्री साडेनऊ वाजता हा गुन्हा दाखल केला आहे. अनोळखी 8 ते 9 जणांविरुद्ध तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
TAGGED:
viral video issue in jalna