हिंगोली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने खूप कठोर भूमिका निभावली होती. अद्यापपर्यंत अत्यावश्यक कामाव्यतिरीक्त कोणालागी कोठेही जाऊ दिले जात नव्हते. यासाठी ई पास ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्यांच्याकडे पास असेल त्यालाच प्रवास करण्यास मुभा दिली जात होती. प्रशासनाच्या या भूमिकेचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात झाला. आता नव्याने काढलेल्या आदेशानुसार कुठेही इच्छित स्थळी जाण्यासाठी पासची अजिबात गरज नाही. तरीही संबंधितांनी नियमाचे पालन करण्याची गरज आहे.
आता विनापास तुमच्या इच्छित स्थळी जा; मात्र या राहणार अटी - hingoli update news
नव्याने काढलेल्या आदेशानुसार कुठेही इच्छित स्थळी जाण्यासाठी पासची अजिबात गरज नाही. तरीही संबंधितांनी नियमाचे पालन करण्याची गरज असल्याचे वक्तव्य जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
प्रवास करत असताना ठीक ठिकाणी थर्मल स्कॅनिंग देखील केली जाणार आहे. मुख्य म्हणजे दुचाकीवर केवळ एकचजण तर तीन अन चारचाकीमध्ये तिघांना प्रवास करता येणार आहे. गेल्या दोन महिन्यांतर प्रवास करण्यासाठी मिळालेल्या या परवानगीमुळे जिल्ह्यातील परिस्थिती ही पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या या महत्वपूर्ण आदेशामुळे रोजगाराना कामाच्या ठिकाणी जाता येता येणार आहे. त्यामुळे त्यांच्यावरील उपासमारीची वेळ देखील टाळण्यास मदत होईल.