जालना -परतूर पोलिसांनी महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा (गोवा) पकडला. या गुटख्याची किंमत १५ लाख ६० हजार रुपये आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी निखील सूर्यकांत कुलकर्णी यांनी परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव मंगळवारी सकाळी आष्टी-परतूर रस्त्यावर गस्त घालत असताना आयशर या वाहनात संशयास्पद माल असल्याचे आढळले. जाधव यांनी ट्रक थांबवून चालकाला आणि सहकाऱ्याला विचारणा केली. त्यांनी यामध्ये गुटखा असल्याचे सांगितले. याप्रकरणी रसूल रुकमोडी इनामदार (वय-35, रा. केसार जळगाव) आणि त्याचा सहकारी जगन्नाथ शिवाजी गायकवाड (वय-24, चिंचोली भुयार) या दोघांविरुद्ध प्रतिबंधित गुटखा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .