जालना - गुढीपाडव्यानिमित्त जालना येथील कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात चित्रकार व छायाचित्रकारांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आले होते.
जालन्यात पाडव्यानिमित्त छायाचित्रांचे प्रदर्शन; प्रेक्षकांचा प्रतिसाद - aurangabad
औरंगाबाद येथील चित्रकार संजीवनी डहाळे तसेच जालना येथील छायाचित्रकार प्राध्यापक विलास भुतेकर, शिक्षक कालिदास वेदपाठक, ज्ञानेश्वर गिराम, यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
औरंगाबाद येथील चित्रकार संजीवनी डहाळे तसेच जालना येथील छायाचित्रकार प्राध्यापक विलास भुतेकर, शिक्षक कालिदास वेदपाठक, ज्ञानेश्वर गिराम, यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. संजीवनी डहाळे यांनी सुमारे २८ वर्षापूर्वी काढलेल्या चित्रांमध्ये आजही जिवंतपणा दिसत होता. तसेच कालिदास वेदपाठक यांनी विविध ठिकाणी केलेल्या भ्रमंतीच्या माध्यमातून लढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले होते.
या विशेष प्रदर्शनांमध्ये त्यांनी पुष्कर हा उंटांचा उत्सव साजरा करणाऱ्या आणि त्यांच्यासोबत जीवन व्यतीत करणाऱ्या लोकांसोबत चार दिवस राहून काढलेले छायाचित्र या प्रदर्शनात ठेवले होते. जालना शहराचे वैभव असलेल्या मोती तलावात दरवर्षी नवनवीन पक्षी येतात. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नसते. नागरिक फक्त तलावाच्या काठावर जाणे , बसणे आणि परत येणे एवढेच काम नागरिक करतात. मात्र या तलावाच्या काठावर आणि तलावात होणाऱ्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न छायाचित्रकार ज्ञानेश्वर गिराम यांनी केला आहे. प्राध्यापक विलास भुतेकर यांचे छायाचित्र पाहण्यासाठी देखील प्रेक्षकांनी गर्दी केली होती. कवी कथाकार किशोर कदम (सौमित्र) यांनी या चित्र प्रदर्शनाला भेट देऊन कलाकारांच्या या कलेची दाद दिली.