जालना - जिल्ह्यातील 104 कोरोना संशयित रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. या सर्व रुग्णांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे जालनेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. असे असले तरिही गेल्या दोन दिवसांपासून जालना शहरात परराज्यातून येत असलेल्या नागरिकांचा लोंढा पाहुन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करावे आणि घरातच रहावे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी म्हटले आहे.
जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...कोरोनाचा व्हायरस दोन वेळा लग्न मुहूर्ताला डसला, नववधूने स्कुटीवरुन सासर गाठून संसार थाटला
यासोबतच जालना जिल्ह्याच्या दोन्ही सीमेवरील औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबाद बुलढाणा आणि त्यापाठोपाठ परभणी शेजारील हिंगोली जिल्ह्यात देखील कोरोनाचा रुग्ण आहे. त्यामुळे या अशा बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे देखील जालना जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे.
जालना जिल्हा प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. मात्र, जे नागरिक बाहेर राज्यातून छुप्या मार्गाने जालन्यात आले आहेत. त्यांना त्यांचे घरचे लोक मदत करत असल्यामुळे त्यांचा शोध घेणे प्रशासनाला अवघड जात आहे. अशा लोकांबद्दल संतापही व्यक्त केला जात आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात आतापर्यंत 126 संभाव्य कोरोनाचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात भरती केले होते. त्यापैकी 104 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.