महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे दानवे यांच्या ऑफिसच्या उद्घाटनाला जालन्यात

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भावाच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी ( MP Amol Kolhe in Jalna ) लावली. मंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

MP Amol Kolhe in Jalna
खासदार अमोल कोल्हे जालन्यात

By

Published : Dec 18, 2022, 11:00 PM IST

जालना : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( MP Amol Kolhe ) यांनी आज जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Minister Raosaheb Danve ) यांचे चुलतबंधू आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावल्यानं राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

खासदार अमोल कोल्हे जालन्यात : आज जालन्यात भास्कर दानवे यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाचं उदघाटन पार पडलं. या कार्यक्रमात अमोल कोल्हे यांचं पगडी देऊन स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हे आणि रावसाहेब दानवे यांच्यात 20 ते 25 मिनिटे दानवे यांच्या गाडीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र कोल्हे यांच्या या अचानक हजेरी मुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details