महाराष्ट्र

maharashtra

जालनेकरांची संक्रांत गोड; जिल्ह्यात कोरोना प्रतिंबधात्मक लस दाखल

By

Published : Jan 14, 2021, 8:32 AM IST

सामान्य रुग्णालयाच्या परिसरातील जिल्हा परिषदेचे औषध भांडारामध्ये बुधवारी एका विशेष व्हॅनमधून सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशील्ड ही लस दाखल झाली आहे. एका बॉटलमध्ये 5ml ची मात्रा आहे आणि प्रत्येक व्यक्तीला 0.5 मिलिलिटर चा डोस दिला जाणार आहे.

जिल्ह्यात कोरोना प्रतिंबधात्मक लस दाखल
जिल्ह्यात कोरोना प्रतिंबधात्मक लस दाखल

जालना -गेल्या १० महिन्यांपासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे सावट आहे. मात्र, या कोरोनावर प्रतिबंधत्मक लसीकरण सुरू होणार असून जालनेकरांसाठी संक्रांतीनिमित्त एक गोड बातमी आहे. ती म्हणजे कोरोनाची प्रतिबंधात्मक लस जालन्यातील औषध भांडारमध्ये दाखल झाली आहे. शनिवारपासून या लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.

पहिल्या टप्प्यात आले 14220 डोस -

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीचे शनिवारपासून देशभरात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जालन्यात देखील ही लस दाखल झाली आहे. सामान्य रुग्णालयाच्या परिसरातील जिल्हा परिषदेचे औषध भांडारामध्ये बुधवारी एका विशेष व्हॅनमधून सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशील्ड ही लस दाखल झाली आहे. एका बॉटलमध्ये 5ml ची मात्रा आहे आणि प्रत्येक व्यक्तीला 0.5 मिलिलिटर चा डोस दिला जाणार आहे. त्यानुसार एका बॉटलमध्ये असलेलेली ही लस दहा जणांना दिली जाणार आहे, अशा एकूण 1422 बॉटल मधील लस 14220 लाभार्थ्यांना मिळणार आहे.

कोरोना अपडेट-

कोरोनाची महामारी आल्यानंतर जालना जिल्ह्यात सहा एप्रिल रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण निष्पन्न झाला होता. तेव्हापासून सामान्य जनतेमध्ये कोरोनाच्या आजारामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आत्तापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये 13 हजार 407 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 12 हजार 886 रुग्ण कोरोना मुक्त होऊन ठणठणीत झाले आहेत. 356 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर सध्या 165 रुग्ण उपचार घेत आहेत.


ABOUT THE AUTHOR

...view details