महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालण्यात जुगार अड्ड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला - attaked jalna

अंबड तालुक्यातील नांदी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक करत हल्ला केला. ७ एप्रिलला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 7, 2019, 10:59 PM IST

जालना - अंबड तालुक्यातील नांदी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक करत हल्ला केला. ७ एप्रिलला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अंदाजे ३० ते ३२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी पो.उप.नि. सुग्रीव चाटे


या घटनेची मिळालेली माहिती अशी, की पोलीस ठाणे अंबड येथील पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ, सुग्रीव चाटे, स.पो.उप.नि. पि.डी.पाटील, पोलीस शिपाई संदिप कुटे, आर. आर. सोनवणे खासगी वाहनाने नांदी येथील यात्रेत सोरट नावाचा जुगार खेळावर छापा मारण्यासाठी गेले होते. पोलिसांनी छापा टाकत सोरट खेळणाऱ्या ३ जणांना ताब्यात घेतले. यावेळी कारवाईला विरोध करत शबाना सय्यद कय्युम (चिंगम), शबीनाबी बाबुलाल सय्यद व इतरांनी पोलिसांची गाडी अडविली. त्यामुळे घटनास्थळी मोठा जमाव जमला होता.


जमावाने पो.उप.नि. सुग्रीव चाटे यांना घेराव घालून त्यांच्याशी हुज्जत घातली. तसेच दगडफेक करत पोलिसांना मारहाण केली. त्यामुळे पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला. जमावाने आरडाओरडा केल्यामुळे गर्दीमधून पकडलेले आरोपी पळून गेले. दगडफेकीमध्ये सुग्रीव चाटे यांच्या हाताला जखम झाली.


या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांना मिळताच त्यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दंगल नियंत्रण पथकही पाचारण करण्यात आले होते. अंदाजे ७० ते ८० जणांचा फौजफाटा नांदी येथे दाखल झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणुन आरोपींची धरपकड करत ५ जणांना ताब्यात घेतले.


याप्रकरणी अंबड पोलीसांत सुग्रीव चाटे यांच्या फिर्यादवरुन १) सय्यद सत्तार सय्यद कडु २) आय्युब सत्तार सय्यद 3) इस्माईल इमाम सय्यद 4) कय्युम सत्तार सय्यद ५) तय्यब निसार सय्यद ६) कलिम इसाक सय्यद ७) सिराज निजाम सय्यद ८) अझहर मंसुर सय्यद ९) सय्यद फकीर सय्यद निजाम १०) सय्यद अहमद सय्यद फकीर मोहम्मद ११) इस्ताक १२) उस्मान १३)नुर १४) तस्लीम सय्यद अल्ताफ सय्यद १५) शमीनाबी बाबुलाल सय्यद १६) सय्यद बाबुलाल सय्यद उस्मान १७) सय्यद हुजर सय्यद मकबुल १८) सय्यद जावेद १९) सय्यद नय्युम सय्यद आय्युम २०) शबाना सय्यद कय्युम ऊर्फ चिंगम सर्व रा.नांदी ता. अंबड यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. या सर्वांवर ३०७, ३५३, ३३३, ३३७, १४३, १४७, १४८, १४९ भा.द.वी सह कलम १२ (अ) म. जु. कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैय्या करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details