महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनते सोबत गद्दारी केली - आमदार बबनराव लोणीकर

शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी करत विरोधकांना जाऊन भेटले. राज्यातल्या जनतेने भाजप शिवसेना महायुतीला जनादेश दिला होता. पण सेना काँग्रेससोबत युती करण्यासाठी महिनाभरापासून काँग्रेसचे दरवाजे झिजवत होती.

शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनते सोबत गद्दारी केली - आमदार बबनराव लोणीकर

By

Published : Nov 23, 2019, 12:34 PM IST

जालना - काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता स्थापन होईल, अशी स्थिती असतना राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राजभवनावर मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. याच संदर्भात भाजप आमदार बबनराव लोणीकर यानी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनते सोबत गद्दारी केली - आमदार बबनराव लोणीकर

हेही वाचा -शरद पवार, उद्धव ठाकरे यांची दुपारी संयुक्त पत्रकार परिषद

लोणीकर म्हणाले, की शिवसेनेने महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी करत विरोधकांना जाऊन भेटले. राज्यातल्या जलतेने भाजप शिवसेना महायुतीला जनादेश दिला होता. पण सेना काँग्रेससोबत युती करण्यासाठी महिनाभरापासून काँग्रेसचे दरवाजे झिजवत होती. अशा शब्दात राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details