जालना - अंबड शहरातील नवीन मोंढा भागात असलेल्या होलसेल किराणा व्यापाऱ्याच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा तब्बल ६ लाखांचा मुद्देमाल पळवला आहे. लग्न कार्यानिमित्ताने व्यापारी दाम्पत्य बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी 'डाव' साधला आहे.
बाहेरगावी गेलेल्या व्यापाऱ्याच्या घरात चोरी; ६ लाखांचा मुद्देमाल लंपास - house
अंबड शहरातील नविन मोंढा भागात असलेल्या होलसेल किराणा व्यापाऱ्याच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा तब्बल ६ लाखांचा मुद्देमाल पळवला आहे. लग्न कार्यानिमित्ताने व्यापारी दाम्पत्य बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी 'डाव' साधला.
अंबड शहरातील नविन मोंढा भागांमध्ये सोहनलाल लालचंद मराठी यांचे गोपाल ट्रेडिंग या नावाने दुकान आहे. महत्त्वाचे म्हणजे दुकान आणि त्यांचे घर एकत्रित आहे. खालच्या मजल्यावर होलसेल किराणा दुकान आहे. तर वरच्या मजल्यावर ते स्वतः आपली पत्नी गंगाबाई राठी यांच्यासोबत राहतात. ते आपल्या पत्नीसोबत ११ जून रोजी लग्न कार्यानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराच्या पाठीमागून घरात प्रवेश केला.
घरात ठेवलेले २ लाख ७० हजार रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.