जालना -जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील सतीश पेहरे या अभियंत्याचा लडाख येथे मृत्यू झाला आहे. सतीश हा भारतीय सैन्यदलात अभियंता म्हणून कार्यरत होता. 14 रोजी लडाख येथे गलवान खोऱ्यात लोखंडी पुलाचे काम सुरू असताना, सतीशच्या डोक्याला उडून आलेला दगड लागला. यात त्याचा मृत्यू झाला.
विशेष विमानाने आज रात्री पोहोचणार सतीश पेहरेचे यांचे पार्थिव - jalna latest news
सुरेश पेहरे यांना तीन मुले आहेत. तीनही मुले भारतीय सैन्यदलात अभियंता म्हणून कर्तव्य पार पाडत आहेत. त्यातील सतीशचा अपघातात मृत्यू झाला.
सुरेश पेहरे यांना तीन मुले आहेत. तीनही मुले भारतीय सैन्यदलात अभियंता म्हणून कर्तव्य पार पाडत आहेत. त्यातील सतीशचा अपघातात मृत्यू झाला. 14 जुलैला लडाख येथे गलवान खोऱ्यात लोखंडी पुलाचे काम सुरू असताना दगड उडून सतीश यांच्या डोक्यात लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सतीशचे पार्थिव आज रात्री उशिरा विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळावर येणार आहे. उद्या शुक्रवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा-लडाखमध्ये महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; जालना जिल्ह्यावर शोककळा