महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जो महापुरूषांची जात काढतो त्याच्याबद्ल बोलायचं नाही', जरांगेंची भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका - मनोज जरांगे

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : सध्या राज्यात आरक्षणावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे अणि राज्य सरकारचे मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (30 नोव्हेंबर) पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर जोरदार टीका केलीय.

Manoj Jarange and Chhagan Bhujbal
मनोज जरांगे अणि छगन भुजबळ

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 2:05 PM IST

जालना Manoj Jarange on Chhagan Bhujbal :जो महापुरूषांची जात काढतो, धनगर आरक्षणाची भूमिका स्पष्ट करत नाही, ज्यांना फक्त आपल्या सभेसाठी गर्दी करायला धनगर बांधव लागतात, अशा माणसाबद्दल बोलायची इच्छा नाही, असं म्हणत मनोज जरांगे यांनी नाव न घेता छगन भुजबळांवर टीकास्त्र सोडलं.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे :आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मनोज जरांगे यांना छगन भुजबळांच्या येवला दौऱ्याविषयी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या लेकरांच्या विरोधात आरक्षण देऊ नका म्हणून बोंबलणाऱ्या, घटनेच्या पदावर बसून जातिवाद करणाऱ्या, तसंच जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा माणसाबद्दल आम्ही काय बोलायचं. त्यांनी शेतीच्या पाहणीसाठी नाही गेलं पाहिजे नाही तर त्या जमिनवाल्यांमागे यांची साडेसाती लागेल. कारण हा माणूस म्हणजे 'पनौती' आहे. त्यामुळं त्याला महत्त्व देण्याची गरज नाही," असा टोलाही जरांगेंनी लगावला.


शेतकऱ्याला मरु देऊ नका : "शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईविषयी बोलण्यासाठी मंत्र्यानं तिथं जाणं गरजेचंच आहे असं नाही. त्यासाठी प्रशासन आहे ना. प्रशासनानं पंचनामे करावे आणि तातडीनं अहवाल द्यावा व शेतकरी वाचवावा. तसंच सरकारला विनंती आहे की, त्यांनी शेतकरी वाचवावा. त्याला मरु देऊ नका. शेतकरी घायाळ झाल्यानं शेतकऱ्याला तातडीनं मदत करायला पाहिजे," अशी विनंतीही जरांगेंनी सरकारकडं केली.

हेही वाचा -

  1. आरक्षण मिळालं तर राजीनामा देईल म्हणणारे गरळ ओकतात, नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांचा भुजबळांना टोला
  2. महात्मा फुलेंना अभिवादनासाठी फुले वाड्यात गर्दी; भुजबळांच्या भाषणाकडं सर्वांचं लक्ष
  3. छगन भुजबळांनी जातिवाचक शब्द काढला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा; जरांगेंची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details