महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लव्हाडे परिवाराचा उपक्रम : कामगारांना किराणा सामान देऊन वाढदिवस केला साजरा! - वाढदिवस

जालन्यातील नवीन मोंढा भागात व्यवसाय करणारे व्यापारी संजय लव्हाडे यांचे नातू अर्हम संदेश लव्हाडे याचा सहावा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आपणही समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून कामगारांना किराणा सामान देऊन साजरा केला.

lavhade family celebrate birthday
http://10.10.50.85:6060//finalout4/maharashtra-nle/thumbnail/15-April-2020/6796803_179_6796803_1586923143380.png

By

Published : Apr 15, 2020, 9:45 AM IST

जालना - शहरातील नवीन मोंढा भागात व्यवसाय करणारे व्यापारी संजय लव्हाडे यांचे नातू अर्हम संदेश लव्हाडे याचा सहावा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आपणही समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून कामगारांना किराणा सामान देऊन साजरा केला.

कामगारांना किराणा सामान देऊन वाढदिवस केला साजरा
कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कामगार वर्गालाही काही काम नाही. दररोज हातावर पोट असणार्‍या या वर्गाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून या निमित्ताने मदत करण्याचा संकल्प व्यापारी संजय लव्हाडे यांनी केला आणि आपला नातू अर्हम याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या घरातील आणि दुकानावरील कामगारांना किराणा सामानाचे वितरण करुन अर्हम लव्हाडे यांचा सहावा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details