जालना - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या 'छक्कड' या रचनेची खिल्ली उडवली होती. याप्रकरणी संतप्त झालेल्या लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको करून निषेध नोंदविण्यात आला.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन - लोकशाही अण्णाभाऊ साठे
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या लावणीची खिल्ली उडवली होती. याचा जाहीर निषेध करत लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी 'माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतेया काहिली' ही छक्कड लिहिली आहे. या रचनेची खिल्ली उडवत रामदास आठवले यांनी 'माझी मैना गावाकडे राहिली, इकडे मी दुसरी पाहिली' असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा जाहीर निषेध करत या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.