महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना : जालन्यात लवकरच स्वतंत्र प्रयोगशाळा, काम युद्धपातळीवर सुरू

जालना जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जालन्यात स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एका इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून प्रयोगशात काम करण्यासाठी पदेही भरण्यात येणार आहे.

युद्धपातळीवर काम सुरु असलेली प्रयोगशाळेची इमारत
युद्धपातळीवर काम सुरु असलेली प्रयोगशाळेची इमारत

By

Published : Jun 15, 2020, 12:18 PM IST

जालना -जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी स्वतंत्र कोव्हिड रुग्णालय उभे राहात आहे. त्यानंतर आता जालनेकरांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळेची तयारी देखील युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणाऱ्या पदांची जाहिरात ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रुग्णालयतील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून सोमवारी दुपारपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. सामान्य रुग्णालयासमोरच असलेल्या एका इमारतीमध्ये ही प्रयोगशाळा सुरू होत आहे. या प्रयोगशाळेत कोरोनाबरोबरच अन्य आजारांच्या देखील तपासण्या होणार आहेत. जालनेकरांंच्या सेवेत ही प्रयोगशाळा कायम असणार आहे. यासाठी लागणाऱ्या रिक्त पदांची जाहिरात ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या जाहिरातीनुसार सोमवारी (दि. 15 जून) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरायची आहेत. उमेदवारांची भर्ती आणि इमारतीची दुरुस्ती दोन्ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. महिन्याच्या शेवटपर्यंत ही प्रयोगशाळा सुरू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

प्रयोगशाळेसाठी सुरु असेले इमारतीचे काम

या प्रयोगशाळेसाठी सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ -1, पॅथॉलॉजिस्ट -1, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ -2, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 4 आणि प्रयोगशाळा सहायकासाठी - 3 अशा पदांची भरती करण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. रविवारी (दि. 14 जून) आठ जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 277 वर पोहोचली आहे. कालपर्यंत (रविवार) जिल्ह्यात आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही प्रयोगशाळा सुरू झाल्यास कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या घेण्यात येतील.

हेही वाचा -जालना कोरोना इफेक्ट : भोकरदनमध्ये तीन दिवस 'जनता कर्फ्यू', आजपासून सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details