जालना - बाहेर कोण काय म्हणतो ते माहित नाही. मात्र, आपण अजूनही मैदानात आहोत. आपला अंतिम निर्णय उद्धव ठाकरेंकडून येत नाही. तोपर्यंत आपण मैदनात नाही असे नाही. त्यामुळे घाई करू नका २ दिवसात तुमच्या मनासारखेच होईल, असे सांगत ही खोतकरांनी दानवेंना दिलेले आव्हान कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
अंतिम निर्णय झालेला नाही, मी अजूनही मैदानातच - अर्जून खोतकर
अंतिम निर्णय झालेला नाही, मी अजूनही मैदानातच... शिवसेना नेते अर्जून खोतकरांचे स्पष्टीकरण ...जालना लोकसभा मतदार संघात दानवेंपुढे खोतकरांचे आव्हान कायम...
मंत्री खोतकर यांनी जालना लोकसभा लढवावी या मागणीसाठी खोतकर यांच्या घरी शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली. त्यावेळी शिवसैनिक आणि पत्रकारांशी बोलताना खोतकरांनी दानवेंना आव्हान दिले आहे.
उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली. त्यानुसार जालनाची जागा शिवेसनेने लढवावी असा आग्रह त्यांनी केला आहे. या जागेचा अंतिम निर्णय झालेला नाही. याचा निर्णय मातोश्रीवर होईल. जनतेची आणि तुमची भावना मी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली आहे. दोन दिवसात आमची बैठक होणार आहे. त्यावेळी यावर निर्णय होईल, अशी माहिती खोतकरांनी यावेळी दिली. अंतिम निर्णय हा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा आहे. २ दिवसात माझा निर्णय मी स्पष्ट करेण आणि तो माझ्या बाजूनेच होईल अशा विश्वास अर्जून खोतकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.