जालना - शिवसेनेचे विद्यमान राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माझ्या नावाचा गैरवापर घेत खोटी कागदपत्रे बनवून ९० कोटींचा भुखंड हडप केल्याचा आरोप डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केला आहे. लाखे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
खोतकरांनी ९० कोटीचा भुखंड हडपला; संजय लाखेंचा आरोप - lakhe
मे. दर्शना इंडस्ट्रीजमध्ये खोतकर परिवारातील अर्जुन खोतकर यांची पत्नी आणि त्यांच्या वडीलांचे नाव होते. या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मी कोणाविरोधात गुन्हा दाखल न करता हे प्रकरण न्यायालयात लढवत आहे, असे लाखेंनी यावेळी स्पष्ट केले.
२६ जून २००२ मध्ये दर्शना इंडस्ट्रीजच्या नावाने अर्ज करून जालना औद्योगिक वसाहतीमध्ये P२ हा भुखंड खोतकर यांनी मागून घेतला. भुखंड वाटपाच्या कमिटीने 2003 मध्ये हा भुखंड नरेंद्र लाखे यांच्या नावाने असल्याने तो देता येणार नसल्याचे सांगितले. यामुळे खोतकरांनी संजय निळकंठ लाखे हे अर्जदार नसतानाही त्यांच्या नावाने बनावट ना हरकत प्रमाणपत्र तयार करून एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले आणि आपली राजकीय ताकद वापरून हा भुखंड दर्शना इंडस्ट्रीजला वाटप झाल्याचे जाहीर केले. मात्र, २००४ मध्ये माहितीच्या अधिकारानुसार सर्व कागदपत्र बाहेर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. तेव्हापासून आपण याविषयी न्यायालयात दाद मागत असल्याचे लाखेंनी सांगितले.
मे. दर्शना इंडस्ट्रीजमध्ये खोतकर परिवारातील अर्जुन खोतकर यांची पत्नी आणि त्यांच्या वडीलांचे नाव होते. या परिवारातील सदस्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मी कोणाविरोधात गुन्हा दाखल न करता हे प्रकरण न्यायालयात लढवत आहे, असे लाखेंनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, सध्या अर्जुन खोतकर हे माझी बदनामी करत धमक्या देत असल्याचा आरोप करत असल्याचे ते म्हणाले.