जालना- अन्नदानामध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या जैन समाजाच्यावतीने भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणकनिमित्त शहरात ताकाचे मोफत वाटप करण्यात येत आहे. ७२ दिवस हा उपक्रम चालणार आहे. जैन समाजाच्या जिनशासन सेवा ग्रुपच्यावतीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हा उपक्रम सुरू झाला आहे.
जालन्यात जिनशासन ग्रुपच्यावतीने ७२ दिवस मोफत ताक वाटपाचा उपक्रम - जिनशासन
१६ जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या ताक वाटपाचा उद्देश भगवान महावीर यांना ७२ वर्षे आयुष्य मिळाले होते. त्या ७२ वर्षाच्या निमित्ताने ७२ दिवस मोफत ताक वाटप केले जात आहे.
गेल्या १२ वर्षांपासून ग्रुपच्या माध्यमातून चंद्रप्रभूजी जैन मंदिर येथे दर रविवारी खिचडी वाटपाचा कार्यक्रम सुरू असतो. या दिवशी अन्नदानही मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, पहिल्यांदाच ताक वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. कोणाचीही जाहिरात यानिमित्ताने केली जात नाही आणि कोणतीही काटकसर करण्यात येत नाही. रोज सुमारे ४०० लिटर ताकाचे वाटप येथे होत आहे.
१६ जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या ताक वाटपाचा उद्देश भगवान महावीर यांना ७२ वर्षे आयुष्य मिळाले होते. त्या ७२ वर्षाच्या निमित्ताने ७२ दिवस मोफत ताक वाटप केले जात आहे. जालना शहरातील मामा चौकाजवळ आणि मुख्य रस्त्यावर ताक वाटप सुरू आहे. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून सुरू होणारा हा उपक्रम सायंकाळपर्यंत सुरू असतो. शहराच्या मुख्य रस्त्यावर आणि भर बाजारपेठेत असलेल्या ताक वाटप केंद्रामुळे शहरवासीयांसह बाहेरगावाहून आलेल्या गोरगरिबांची आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची सोय होत आहे.