भोकरदन (जालना) - बारावी इयत्तेत कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्याने आत्महत्या केली घटना समोर आली आहे. किरण भगवान सपकाळ (रा. धावडा) असे मृताचे नाव आहे.
बारावीत मिळाले कमी टक्के; विद्यार्थ्याची आत्महत्या - पारध पोलीस ठाणे
16 जुलैला दुपारी एक वाजता 12 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. त्यात किरणला कमी टक्केवारी मिळाली. यानंतर तो तणावात गेला होता. सायंकाळी 6 वाजेनंतर तो कुणालाही न सांगता शेतात गेला. मात्र, तो रात्रभर घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी सकाळीच शेतात जाऊन त्याचा शोध घेतला. यावेळी त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला.
16 जुलैला दुपारी एक वाजता बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला. त्यात किरणला कमी टक्केवारी मिळाली. यानंतर तो तणावात गेला होता. सायंकाळी 6 वाजेनंतर तो कुणालाही न सांगता शेतात गेला. मात्र, तो रात्रभर घरी न आल्याने त्याच्या घरच्यांनी सकाळीच शेतात जाऊन त्याचा शोध घेतला. यावेळी त्याचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. यामुळे त्याने सायंकाळी शेतात जाऊन मध्यरात्रीच स्वतःच्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याचा मोठा भाऊ भगवान सपकाळने पारध पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
यानंतर सपोनि शंकर शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदिप सरडे, गोपनीय शाखेचे सुरेश पडोळ, विकास जाधव आणि जीवन भालके यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. यानंतर मृतदेह वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास प्रदिप सरडे, विकास जाधव आणि जीवन भालके करत आहेत.