महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालना रेल्वेस्थानक बनलंय रिकामटेकड्यांसाठी आराम करण्याचं ठिकाण - comman citizan

शहरातील रेल्वेस्थानक भर उन्हाळ्यामध्ये रिकामटेकड्यांसाठी आराम करण्याचे ठिकाण बनले आहे. दुपारच्या वेळी प्रवासी नसलेले लोक स्थानकामध्ये येवून झोपा काढत आहेत. त्याचा त्रास इतर प्रवाशांना होत आहे.

जालना रेल्वे स्थानक

By

Published : Apr 10, 2019, 6:22 PM IST


जालना - शहरातील रेल्वेस्थानक भर उन्हाळ्यामध्ये रिकामटेकड्यांसाठी आराम करण्याचे ठिकाण बनले आहे. दुपारच्या वेळी प्रवासी नसलेले लोक स्थानकामध्ये येवून झोपा काढत आहेत. त्याचा त्रास इतर प्रवाशांना होत आहे. या समस्येकडे रेल्वे प्रशासानाचेही दु्र्लक्ष होत आहे.

जालना रेल्वे स्थानक
गेल्या सहा महिन्यांत रेल्वेच्या दोन विभागीय व्यवस्थापकांनी दौरे करूनही जालना रेल्वे स्थानकाच्या सुविधांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जात आहेत. याचाच प्रत्यय सध्या जालना रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी प्रवासी नसणारे लोकदेखील स्थानकात येऊन आराम करत आहेत.


या रिकामटेकड्या लोकांमुळे मात्र, खऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत रेल्वे पोलीस बलदेखील काहीच बोलण्यास तयार नाही. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कामाचा ताण पडत असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. स्थानकावर दिवसेंदिवस रेल्वेच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, त्यामानाने कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. स्थानकामध्ये येण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटही अनेकजण काढत नाहीत, यासंदर्भात विचारणादेखील होत नाही, त्यामुळे स्थानकांत रिकामटेकड्यांचा मुक्त प्रवेश सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details