महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ दरोडेखोरांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

व्यापाऱ्यावर हल्ला करून दीड लाख लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ दरोडेखारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

By

Published : Jul 27, 2019, 7:49 PM IST

व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ दरोडेखोरांना अटक

जालना - येथील एका व्यापाऱ्यावर हल्ला करून त्यांच्याजवळील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ दरोडखोरांना अटक करण्यात आली आहे. जालन्यातील स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

व्यापारी गणेश तिवारी हे २४ जुलै रोजीच्या रात्री दुकान बंद करून घरी जात होते. त्यादरम्यान मंठा चौफुलीजवळ मोटार सायकलवरून आलेल्या ३ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दरोडेखोरांनी जखमी तिवारी यांच्याजवळील रोख दीड लाख रुपये असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी आरडाओरड करताच दरोडेखोर पसार झाले.

याप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी तपासचक्रे फिरवून आज आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. निल शाह, निलेश काकडे व गणेश सातपुते या ३ दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details