महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यातील व्यक्तीला औरंगाबादमध्ये कोरोनाची लागण; जिल्हा प्रशासन सतर्क - aurangabad

जालना येथील रहिवासी असलेली व्यक्ती औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित झाल्याने या रुग्णाची पार्श्वभूमी आणि हा रुग्ण अन्य किती लोकांच्या सानिध्यात आला होता याचा तपास जिल्हा प्रशासन घेत आहे.

jalna person corona infected in aurangabad
जालन्यातील व्यक्तीला औरंगाबादमध्ये कोरोनाची लागण;जिल्हा प्रशासन सतर्क

By

Published : Apr 30, 2020, 10:38 AM IST

जालना-शहरातील साईनाथ नगर भागात राहणाऱ्या एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.जालना शहरात राहणारा हा व्यक्ती औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय अर्थात घाटीमध्ये कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे.

जालना शहरातील हा व्यक्ती औरंगाबाद येथेच उपचार घेत आहे. दरम्यान, जालना येथील रहिवासी असल्यामुळे या रुग्णाची पार्श्वभूमी आणि हा रुग्ण अन्य किती लोकांच्या सानिध्यात आला होता याचा तपास जिल्हा प्रशासन घेत आहे.

औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने जालना जिल्हा प्रशासनाला ही माहिती कळवून पुढील उपाययोजना कळविण्याचे निर्देश दिलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details