जालना -जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने आंदोलन जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.
संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या
- परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी
- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अंशदान कपातीच्या पावत्या उपलब्ध करून द्याव्यात
- सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला हप्ता रोखीने देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.