जालना - काही चोरट्यांनी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घरासमोरुन एका व्यक्तीच्या मालकीचा ट्रक चोरला. संशय येऊ नये म्हणून चोरट्यांनी ट्रकमधील कोल्ड्रींक्सच्या क्रेट्समध्ये तिजोरी लपवली.
तिजोरी चोरणाऱ्या चोरट्यांच्या ट्रकची खांबाला धडक; पोलिसांना पाहताच चोरटे पसार ट्रकमधून तिजोरी पळवणाऱ्या चोरांचा पोलिसांनी पाठलाग केला. यादरम्यान, ट्रक विजेच्या खांबाला धडकला आणि अंधाराचा फायदा घेऊन चार चोरटे पसार झाले. परंतु, गाडीतील जुनाट तिजोरी, लोखंडी पहार व लाकडी दांडा असा मुद्देमाल सदर बाजार पोलिसांनी जप्त केला आहे.
हेही वाचा -अमरावती: अंबरनाथमधील सुवर्णकाराकडून चोरीच्या सात किलो चांदीसह दागिने जप्त
शहरातील अग्निशमन दलाच्या परिसरात उभे असलेल्या ट्रकमधून कोल्ड्रिंक्सची वाहतूक करण्यात येत होती. संशय आल्याने गस्तीवर असलेल्या पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग केला. दरम्यान, संबंधित ट्रक विजेच्या खांबाला धडकून त्याचा अपघात झाला; आणि चोरटे तिजोरी जागेवरच सोडून पसार झाले.
हेही वाचा -जप्त केलेला युरिया खताचा साठा गोदाम मालकांनी चोरला, दोघांविरोधात गुन्हा दाखल
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पुढील चौकशी केली. तसेच अधिक तपासासाठी श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली. सध्या तिजोरी व वाहन पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.