जालना -परतूर तालुक्यातील श्रीष्टी येथे जालना - आष्टी बस कसुरी नदीवरील पुलावरून कलंडल्याची घटना घडली आहे. या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बसमध्ये 25 प्रवाशी होते, त्यात 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे.
हेही वाचा -घानेवाडी जलाशय ओव्हर फ्लो; जालनावासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला!
पुलावरील पाण्यातून बस नेल्याने पुराच्या पाण्याच्या वेगाने बस पुलावरून कलंडली. स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, बस चालक आणि वाहक फरार झाले आहेत.
बस परतूरहून आष्टीकडे जात असताना ही घटना घडली. रात्री 8 वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याने मदतकार्यात अडथळे आले, तरीही स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्याने तातडीने प्रवाशांना उलटलेल्या बसमधून बाहेर काढण्यात आले. बसमधून प्रवास करणारे सर्व 25 प्रवाशी सुखरूप आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा -जालना : राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत नाही - राजेश टोपे