जालना- जिल्हा परिषदेमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा यशस्वी झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये अध्यक्षपदी शिवसेनेचे उत्तम वानखेडे तर उपध्यक्षपदी राष्ट्रवादीचे महेंद्र पवार यांची निवड झाली आहे.
जालना जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता, भाजपला शह - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक
यापूर्वी देखील जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीचे सदस्यांची संख्या जास्त असतानाही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात सेना-राष्ट्रवादीला यश आले होते. त्यानंतर अडीच वर्षांनी देखील राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची राज्यात महाविकास आघाडी झाल्याने झेडपीची सत्ता राखण्यात त्यांना पुन्हा यश आले आहे.
यापूर्वी देखील जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टीचे सदस्यांची संख्या जास्त असतानाही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात सेना-राष्ट्रवादीला यश आले होते. त्यानंतर अडीच वर्षांनी देखील राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची राज्यात महाविकास आघाडी झाल्याने झेडपीची सत्ता राखण्यात त्यांना पुन्हा यश आले आहे. या पूर्वीचे चित्र मात्र उलटे होते. त्यावेळी शिवसेनेचे विद्यमान मंत्री अर्जुन खोतकर होते. तर राष्ट्रवादीचे राजेश टोपे घनसांवगीचे आमदार होते. यावेळी मात्र, राजेश टोपे मंत्री आहेत, तर शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे माजी मंत्री आहेत.