जालना - देशात बहुसंख्य समाजाच्या भावनांना प्राधान्य दिले जाते. मात्र, भारतात बहुसंख्य हिंदू असूनही, त्यांच्याच भावना पायदळी तुडवल्या जातात. हे आता बंद करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती सभा हाती घेण्यात आली. यामध्ये 2023 मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
2023 मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल..! - 2023 मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदूराष्ट्र जागृती सभेचे जालन्यात आयोजन करण्यात आले होते. यावेळी 2023 मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल, असा विश्वास हिंदू राष्ट्र जागृतीच्या सभेत व्यक्त करण्यात आला.
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदूराष्ट्र जागृती सभा हाती घेण्यात आल्या आहेत. या सभांच्या माध्यमातून हिंदूंची जनजागृती करणे, त्यांना आवश्यक ती मदत करणे, महिलांना स्वावलंबन शिकवणे, धर्मप्रसार करणे आणि भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषीत करणे हाच या सर्वांचा उद्देश असल्याचा सूर हिंदू राष्ट्र जागृती सभेतून निघाला. 2023 पर्यंत भारत हिंदू राष्ट्र होईल, असा विश्वासही व्यक्त केला गेला.
हिंदू संघटन आणि हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असलेल्या हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आझाद मैदानावर हिंदू राष्ट्र जागृती सभा आयोजित करण्यात आली होती. सनातन संस्थेचे धर्मप्रसारक नंदकुमार जाधव, श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष टी. राजासिंह, हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट, आदी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जालना शहरात देखील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली होती.