जालना - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून टाकलेल्या छाप्यामध्ये धारदार शस्त्र साठ्यासह आरोपीला अटक करण्यात आली आहे. अजय सुब्रमणी श्रीसुंदर (२८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
जालन्यात धारदार शस्त्रासह एका आरोपीला अटक
अजय सुब्रमणी श्रीसुंदर (२८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. जालना पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जालना शहरातून गोकुळवाडीकडे जाणाऱ्या रत्यावर असलेल्या हरी गोविंदनगर येथील घरामध्ये अजय सुब्रमणी श्रीसुंदर (२८) या व्यक्तीच्या घरी अवैध शस्त्रांचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता या व्यक्तीच्या घरी जिन्याखाली फर्निचरमध्ये लपवून ठेवलेल्या तीन धारदार तलवारी, एक गुप्ती, एक कुकरी, एक खंजर, एक रेम्बो चाकू ,एक सतुरा असा धारदार शस्त्रांचा साठा पोलिसांना सापडला.
याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अजय श्रीसुंदर याला अटक केली असून तालुका जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, जप्त केलेल्या धारदार शस्त्रांची अधीक्षक एस. चैतन्य यांनी पाहणी करून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांचे कौतुक केले आहे.