जालना - बदनापूर तालुक्यात पोलीस व महसूल प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून उगडपणे अवैधरित्या वाळू वाहतूक करण्यात येत आहे. यासंबंधी गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या विशेष पथकाला मिळली. संबंधित माहितीची दखल घेत पथकाने सोमठाणा रस्त्यावर तीन मोठे ट्रकवर कारवाई केली. यानंतर हे हायवा ट्रक तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले. विशेष पथकाने अचानक केलेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
बदनापुरात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले; जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई
अवैध वाळू वाहतूकीसंबंधी गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱयांनी नेमलेल्या विशेष पथकाला मिळली. संबंधित माहितीची दखल घेत पथकाने सोमठाणा रस्त्यावर तीन मोठ्या ट्रकवर कारवाई केली.
बदनापूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून राजरोसपणे वाळू माफिया उपसा करत असून तालुक्यातील सोमठाणा, रोषणगाव, आदी भागात अवैध वाळू विक्री करण्यात येते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्यांना धमकावल्याचे प्रकारही समोर आले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात देखील तक्रार करण्यात आली आहे. बदनापूर तालुक्यात पोलीस व महसूल प्रशासनाच्या सहकार्याने अवैध वाळू उपसा व विक्री सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांना मिळाली. यानंतर त्यांनी माफियांवीरोधात कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती केली.
संबंधित वाळू विक्री प्रकरणाबद्दल 29 नोव्हेंबरला पथकातील साबळे, डोईफोळे, मोरे, तसेच पोलीस कर्मचारी अजय राजपूत, संतोष अंभोरे यांना माहिती मिळाली. यानंतर तीन हायवा (क्रमांक एमएच 20 ईझेड 5273, एमएच 21 बीएच 7009, एमएच 21बीएच 7000) ताब्यात घेण्यात आल्या.