जालना - अंबड तालुक्यातील गोंदी येथे महसूल विभागाने अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ४० लाखांचे वाळुसाठे जप्त करण्यात आले. अंबड तालुक्यात वाळु माफीयांनी मोठे बस्तान मांडले असून कुठल्याच अधिकाऱ्यांचा वचक राहीलेला नाही, पूर्वी रात्रीच्या वेळी गोदपात्रातून वाळूचा उपसा केला जात होता. आता तर दिवसाही बिनबोभाट वाळू उपसा सुरू करण्यात आला आहे.
गोदापात्रातील ४० लाख रुपयांचे वाळूसाठे जप्त - tractor
शेजारील बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी गेल्या दोन दिवसांपासून गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीतच मुक्काम ठोकून हजारो ब्रास वाळुसाठा जप्त केला.
शेजारील बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी गेल्या दोन दिवसांपासून गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीतच मुक्काम ठोकून हजारो ब्रास वाळुसाठा जप्त केला. वाळुमाफीयांनी बस्तान मांडु नये त्यामुळे हा साठा जागेवरच न ठेवता सुरक्षित स्थळी हलवल्यान आला. त्यामुळे वाळू माफीयांचे धाबे दणदणाले आहेत. त्यामुळे गोदावरीच्या एका काठावर एवढी मोठी कारवाई होत आहे आणि दुसऱ्या काठावर असलेल्या जालन्यात काहीच कारवाई होत नव्हती, त्यामुळे जनतेमध्ये संताप व्यक्त होत होता.
त्यामुळे अंबडच्या उपविभागीय अधिकारी व पथकाला जाग आली आणि काल गोंदी येथे कारवाई करण्याची हिंमत दाखवली असता, यामध्ये फक्त दोनच ट्रॅक्टर व जेसीबी पळून जताना पलटी झाल्यामुळे पकडण्यात आले. यात जवळपास ६० ते ७० ट्रॅक्टरने पळ काढल्याने दोन ट्रॅक्टरवरच कारवाई करण्यात आले. अधिकारी पुन्हा परत फिरताच वाळू माफीयांनी बस्तान मांडल्याने उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल अंबड तहसीलदार मनिषा मेने व त्यांच्या पथकासह गोंदी गाव गाठले परंतु याची वाळुमाफीयांना भणक लागताच वाळुमाफीया भूमिगत झाले.
गोंदी परिसरात गोदापात्रातील कार्यवाहीसाठी जात असलेले अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांना वाळू वाहतूक करणारा एक हायवा एम. एच. २१- ६३२२ हा ट्रक आढळला. त्याच्या पावतीची पाहणी केली असता पावती ही साठ्यावरील लिलावाची असल्याचे निर्देशानास आले. वाळू साठ्यावर पाहणी केली असता ती हायवा साठ्यावरून भरलेली नसल्याची आढळून आले. त्यामुळे या हायवावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे हदगल यांनी सांगितले. गोदा पात्रातून दररोज अवैधरित्या उपसा व वाहतूक होत असलेल्या हजारो ब्रास वाळू प्रशासनाच्या नजरे समोरून राजरोस होत आहे. मात्र प्रशासनाकडून या सर्व प्रकाराकडे डोळेझाक केला जात आहे. या मागे लाखो रुपयांची अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी परिसरातून होत असलेला अवैध वाळू उपसा व गोंदी गोदावरी परिसरात केलेले अवैध वाळू साठे महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी, तलाठी असताना होतात कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी बीड जिल्हा अधिकाऱ्यांचा कारवाईच्या पाऊलावर पाऊल ठेवत गोंदी येथील, सिध्देश्वर मंदिराजवळील ५५० ब्रास वाळुसाठा जमिनदोस्त केला. डोरली पुलाजवळील, गायरान जमीनीवर अवैधरित्या साठवलेले २२० ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला तर वैतागवाडी येथील ३०० ते ४०० ब्रास वाळुसाठा जप्त करण्यात येवून पात्राच्या बाहेर सर्व अवैध साठा केलेले ढिगारे उचलून पोलीस कॉलनीत नेऊन टाकण्यात आले व गोदापात्रातील ढिगारे पात्रातच सपाट करुन टाकले.