महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जालन्यात गंगोदकाने भोलेश्वरला अभिषेक - जालना बातमी

श्रावणातील या कार्यक्रमांना एक वेगळेच महत्व असते. यामध्ये श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे.

जालन्यात गंगोदकाने भोलेश्वरला अभिषेक

By

Published : Aug 25, 2019, 5:00 PM IST

जालना - श्रावणी सोमवारनिमित्त शहरातील रोहनवाडी रस्त्यावरच्या भोलेनाथ मंदिरात गंगोदकाने अभिषेक विधीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी काल्याच्या कीर्तनाने श्रावण महिन्यातील विविध कार्यक्रमांचा समारोप केला जाणार आहे. मंदिरात बाराही महिने विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. श्रावणातील या कार्यक्रमांना एक वेगळेच महत्व असते. यामध्ये श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे.

जालन्यात गंगोदकाने भोलेश्वरला अभिषेक

श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त भोलेश्वरला जलाभिषेक करण्यात येणार आहे. या जलाभिषेकासाठी शहागड येथून वाहणाऱ्या गोदावरी गंगेच पाणी खांद्यावर कावड घेऊन भाविक गुरुवारी दुपारी शहागड येथून निघाले होते. रविवारी हे भाविक मंदिरात पोहोचले . सोमवारी काल्याच्या कीर्तनाने आणि या गंगोदकाच्या अभिषेकाने धार्मिक कार्यक्रमाचा समारोप केला रणार आहे. 22 तारखेला शहागड येथून निघालेल्या या दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details