जालना - होळी सणानिमित्त गुरुवारी खेळलेल्या रंगांमध्ये नागरिक रंगात चिंब भिजून निघाले. जालन्यातही होळीनिमित्त विविध संस्कृतिक आणि देशभक्तीपर गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अखिल भारतीय मारवाडी स्नेहसंमेलनाच्या वतीने होली प्रीत मिलन (सजनगोठ) या जागो हिंदुस्थानी या कार्यक्रमामुळे आणखी भर पडली.
जालन्यात होळीनिमित्त 'प्रितीमिलन'.. भारतीय संस्कृती आणि देशभक्तीचे दर्शन - culture
कोल्हापूर येथील प्राध्यापक सुरेश शुक्ल यांचे दिग्दर्शन व संयोजक असलेल्या स्वर निनाद संगीत मंचने उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन करताना डोळ्यासमोर उभे केलेल्या देशभक्तीचे चित्र आणि देशभक्तांनी सहन केलेल्या त्रासाची माहिती सांगताना अंगावर रोमांच उभे राहिले.
गुरुवारी रात्री अखिल भारतीय मारवाडी संमेलन, अखिल भारतीय मारवाडी युवा मंच, मिडटाऊन आणि महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्यावतीने होली प्रीतमिलनच्या कार्यक्रमानिमित्त जागो हिंदुस्थानी या देशभक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर येथील प्राध्यापक सुरेश शुक्ल यांचे दिग्दर्शन व संयोजक असलेल्या स्वर निनाद संगीत मंचने उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन करताना डोळ्यासमोर उभे केलेल्या देशभक्तीचे चित्र आणि देशभक्तांनी सहन केलेल्या त्रासाची माहिती सांगताना अंगावर रोमांच उभे राहिले.
रुक्मिणी गार्डन येथील हिरवळीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सर्व समाजातील अबाल वृद्ध , देशभक्त उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकरही उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जवानांनी दिलेले बलिदान, त्यांनी भोगलेला हालअपेष्ठा, भारतीय संस्कृती, हिंदुत्व, अशा विविध प्रकारच्या पैलूंनी कार्यक्रमाला उजाळा दिला. यावेळी बनारसी दास जिंदल, द्वारकाप्रसाद सोनी, यांच्यासह घनश्यामदास गोयल, ब्रिजमोहन लड्डा, सुभाष देवीदान, उमेश पंचारिया, वीरेंद्र धोका, गोविंद प्रसाद मुंदडा, सुदेश करवा, महेश भक्कड, पवन जोशी, सुनील राठी, मनीष तवरावाला आदी उपस्थित होते.