महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गुटखा माफियांवर जालना पोलिसांची कारवाई; दोन लाखांचा गुटखा जप्त - सदर बाजार पोलीस

जालना शहरातील बिटको ट्रान्सपोर्टच्या गोडाऊन समोर एका रिक्षामधील 2 लाख किंमतीचा गुटखा जप्ता केला आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. मात्र, अन्न व ओषध प्रशासनाचा हलगर्जीपणा यात समोर आला आहे.

दोन लाखांचा गुटखा जप्त

By

Published : Nov 19, 2019, 9:47 PM IST

जालना -शहरातील बिटको ट्रान्सपोर्टच्या गोडाऊन समोर एका रिक्षामधील 2 लाख किंमतीचा गुटखा जप्ता केला आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. मात्र, अन्न व ओषध प्रशासनाचा हलगर्जीपणा यात समोर आला आहे.

गुटखा माफियांवर जालना पोलिसांची कारवाई; दोन लाखांचा गुटखा जप्त

हेही वाचा - दिवे घाटामध्ये दिंडीत घुसला जेसीबी; संत नामदेव महाराजांच्या वंशजासह एक वारकरी ठार

शहरात खुलेआम गुटखा मिळत आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात अन्न व औषध प्रशासन अपयशी ठरत आहे. पोलिसांची जबाबदारी नसली तरी कर्तव्याचे भान ठेवून शहरांमध्ये दर एक दोन महिन्याला लाखो रुपयांचा गुटखा पोलीस आतापर्यंत पकडत आले आहेत. यातूनच काल सोमवारी रात्री नऊच्या सुमारास लाखोंचा गुटखा जप्त करण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. ही माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लगेच दिली. मात्र, हे अधिकारी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घ्यायलाही आले नाहीत.

हा गुटखा कुठून आला असावा? याची सर्व माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळू शकलेली नाही. किंग रॉयल पान मसालाच्या नावाखाली अकरा गोण्यांमध्ये प्रत्येकी चार बॉक्स असे एकूण 44 बॉक्समध्ये 1760 पेपर बॉक्स निघाले. यामध्ये प्रत्येकी बत्तीस पाउच होते. असे 120 रुपये एका बॉक्सची किंमत असलेल्या या गुटख्याची एकूण किंमत 2 लाख 11 हजार 200 रुपये होते. एवढा मोठा गुटखा पडलेला असताना देखील अन्न व औषध प्रशासनाने दुपारी बारावाजल्या नंतर येऊन कसाबसा सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. अन्न व सुरक्षा अधिकारी वर्षा ताराचंद रोडे यांनी हा गुन्हा नोंदविला आहे.

हेही वाचा - पाहा ट्रेलर : 'हर एक मराठा में छुपा है एक लाख मराठा' : 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर'

ABOUT THE AUTHOR

...view details