जालन्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन - जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी आज (बुधवार) जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शासनाने परिपत्रक काढून पाच महिने झाले, मात्र यावर अंमलबजावणी झाली नाही.
जालन्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
जालना - शासनाने 2 मार्च 2019 ला काढलेल्या परिपत्रकानुसार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर प्राधान्याने नेमणूक देण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, अद्याप नियुक्तीपत्र न मिळाल्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज (बुधवार) जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.