जालना - शहराला लागूनच असलेल्या इंदेवाडी येथील दूध व्यावसायिकाच्या 4 म्हशी अज्ञात कारणाने एकाच रात्रीत दगावल्याची घटना घडली आहे. गेल्या पंधरा दिवसात या दूध व्यावसायिकाच्या सहा म्हशी मरण पावल्या आहेत. बुधवारी सकाळी चार म्हशी दगावल्याची घटना उघडकीस आल्यानंतर दूध व्यावसायिकाला अश्रू आवरता आले नाही.
अज्ञात कारणाने एकाच रात्रीत दगावल्या चार म्हशी; दूध व्यावसायिक हवालदिल - चार म्हशी एका रात्रीत दगावल्या
जालना शहराला लागूनच असलेल्या इंदेवाडी येथे शिवाजी दूनगहू हे दूध व्यवसाय करतात. त्यांच्याकडे सुमारे 15 म्हशी आहेत. या म्हशी पैकी 15 जानेवारीपासून आत्तापर्यंत सहा म्हशी दगावल्या आहेत. म्हशींच्या शवविच्छेदनानंतरच या म्हशी कशामुळे दगावल्या हे समजू शकेल.
हेही वाचा -रहमती पीरच्या तिसऱ्या उरुसासाठी राज्यभरातून भाविकांची हजेरी
जालना शहराला लागूनच असलेल्या इंदेवाडी येथे शिवाजी दूनगहू हे दूध व्यवसाय करतात. त्यांच्याकडे सुमारे 15 म्हशी आहेत. या म्हशीपैकी 15 जानेवारीपासून आत्तापर्यंत सहा म्हशी दगावल्या आहेत. त्यापैकी चार म्हशी या मंगळवारी रात्रीत अज्ञात कारणाने दगावल्या. सुमारे एका लाखाची एक म्हैस याप्रमाणे या म्हशीची किंमत होती. प्रत्येक म्हैस सकाळी 10 लिटर दूध देत होती. या चारही म्हशी कशामुळे दगावल्या हे अद्याप समजू शकले नाही. म्हशींच्या शवविच्छेदनानंतरच या म्हशी कशामुळे दगावल्या हे समजू शकेल. अचानक या म्हशी दगावल्यामुळे या व्यावसायिकावर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.