महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विशेष : उद्योजकांच्या दूरदृष्टीमुळे जालन्यातील औद्योगिक वसाहत अल्पावधीतच पूर्वपदावर - जालन्यातील औद्योगिक वसाहत पूर्वपदावर

२२ मार्चपासून देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. मात्र त्याच्या तीन दिवस आधीच १९ मार्चपासून जालन्यातील औद्योगिक वसाहतीमधील संपूर्ण उद्योग व व्यवसाय बंद होते. सध्या जालन्यातील औद्योगिक क्षेत्र ९० टक्के पूर्ववत झाले आहे.

jalna midc
जालन्यातील औद्योगिक वसाहत अल्पावधीतच पूर्वपदावर

By

Published : Oct 23, 2020, 6:38 PM IST

Updated : Oct 23, 2020, 6:49 PM IST

जालना -कोरोना सारख्या जागतिक महामारीमुळे महाराष्ट्रातील मोठ्या शहरांतील उद्योग व्यवसाय डबघाईला आले आहेत. मात्र जालन्यातील उद्योजकांनी व व्यापाऱ्यांनी दूरदृष्टी ठेवून कामगारांना थांबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे टाळेबंदीनंतर सध्या औद्योगिक क्षेत्र 90% पूर्ववत सुरू झाले आहे. 22 मार्चला शासनाने अधिकृत टाळेबंदी सुरू केली मात्र तत्पूर्वीच जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी तीन दिवस टाळेबंदी जाहीर केली होती.

जालन्यातील औद्योगिक वसाहत अल्पावधीतच पूर्वपदावर

19 मार्च पासूनच जालन्याची औद्योगिक वसाहत बंद होती. जालना औद्योगिक वसाहतीची ओळख ही स्टील इंडस्ट्रीमुळे आहे आणि त्यापाठोपाठ तेल बियाणे कंपन्यांचा क्रमांक आहे. या सर्व कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या मोठी आहे. टाळेबंदीमुळे शासनाने अशा कामगारांना घरी जाण्यासाठी दोन महिन्यानंतर वाहनांची व्यवस्था केली. याचवेळी स्टील उद्योजकांनी दूरदृष्टी ठेवून हे कामगार जर गावी परत गेले तर परत कधी येतील? किती येतील? येतीलच का नाही? ही शक्यता ग्राह्य धरून सुमारे दीड हजार कामगारांना या इंडस्ट्रीने दोन महिने येथेच राहण्याची व्यवस्था केली. त्याचबरोबर त्यांची भोजन-निवास व्यवस्था करून पगाराचीही व्यवस्था केली त्यामुळे हे कामगार जाण्यातच थांबले आणि त्याचा परिणाम लॉक डाऊन उठल्यानंतर लगेचच जालना येथील औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांच्या चिमण्यांमधून धूर निघायला सुरुवात झाली आणि यंत्राची चाके फिरू लागली. त्यामुळे स्थानिक कामगारांना देखील घरी बसण्याची वेळ आली नाही. या परप्रांतीय कामगारांना दोन महिने सांभाळल्यामुळे जालन्यातील औद्योगिक वसाहत अल्पावधीत पूर्वपदावर आली आहे. जालन्यात कोणावरही बेरोजगार होण्याची वेळ या उद्योजकांनी येऊ दिली नाही. टाळेबंदीच्या काळात दोन महिन्यांमध्ये दोनशे कोटींचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला आहे तो भरून काढण्यासाठी हे उद्योजक पुन्हा आता नव्या जोमाने कामाला लागले आहेत .

लोखंडी सळ्यांच्या एकूण उपयोगापैकी 40% सळ्या या शासकीय कामासाठी उपयोगात आणल्या जातात. मात्र सध्या शासनाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत आणि नवीन प्रकल्प सुरू झालेले नाहीत याचा परिणाम देखील स्टील इंडस्ट्रीवर झालेला आहे. उर्वरित 60 टक्के बांधकाम व्यवसायामध्ये घरांची बांधकामे निवासी सदनिका यावर याचा वापर होतो. यासाठी वापरल्या जातात मात्र सध्या नागरिकांकडे पैसा नाही आणि जिथे पैसा आहे तिथे वाळू नाही. त्यामुळे ही बांधकामे देखील बंद आहेत आणि एकूणच या दोन्ही प्रकारामुळे लोखंड विक्रीच्या प्रमाणात 50 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. असे असले तरीही टाळेबंदीच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ही स्टील इंडस्ट्री पुन्हा सक्षमपणे उभी आहे

जालना औद्योगिक वसाहतीमध्ये पंधरा वर्षापूर्वी लोखंडी सळ्या उत्पादन करणारे सुमारे पन्नास कारखाने होते. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न केल्यामुळे काही कारखाने बंद पडले तर काही उद्योजकांनी एक दुसऱ्यासोबत भागीदारी केली आणि दोन कारखाने एकत्र केले. त्यामुळे आज हा आकडा कमी झाला आहे आणि सक्षमपणे पूर्ण क्षमतेने सुरू असलेल्या कारखान्यांचा आकडा पंधराच्या सुमारास आहे.

Last Updated : Oct 23, 2020, 6:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details