जालना- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या विक्रीशिवाय दारू, बार व अन्य व्यवहार बंद आहेत. दारूची दुकाने व बार बंद असल्याने तळीराम काळ्या बाजारातून मिळेल त्या भावात दारू खरेदी करून दारू पित आहेत. याचा गैरफायदा घेऊन नूतन वसाहत भागातील चंद्रलोक बार हॉटेलच्या मालकाने मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल उघडून दारूचा साठा कारमध्ये (एमएच-१४, एएम-३७१७) भरून घेतला.
लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूविक्री; चंद्रलोकच्या बरमालकासह 5 जणांना अटक - जालना कोरोना
स्थानिक गुन्हे शाखेच्या रात्रगस्तीवर असलेल्या पथकाला याबाबत माहिती मिळताच या कारचा पाठलाग करून ती कार मुद्देमालासह स्टेशन रोडवर मध्यरात्री पाऊण वाजता पकडली आणि कारसह 2 लाख 13 हजारांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.
याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या रात्रगस्तीवर असलेल्या पथकाला याबाबत माहिती मिळताच या कारचा पाठलाग करून ती कार मुद्देमालासह स्टेशन रोडवर मध्यरात्री पाऊण वाजता पकडली आणि कारसह 2 लाख 13 हजारांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी बारमालक अरुण पेरे, त्याचे साथीदार शिवहारी आवटे, मॅनेजर मंगेश संघपाल, अकाऊंटट योगेश ढवळे आणि कारचालक संजय उजाड या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोलीस कर्मचारी रामप्रसाद रंगे, गोकुळसिंग कायटे, चालक पैठणे आदींनी ही कारवाई केली आहे.