जालना - शहरातील औद्योगिक परिसरात असलेल्या मुलचंद फुलचंद कृषी उद्योग प्रायव्हेट लिमिटेड या कापसाच्या जिनिंगला आज सकाळी 11 वाजता आग लागली या जिनिंगमध्ये कापसापासून सूत आणि गाठी बनवण्याचा प्रक्रिया केली जाते. त्यासोबत सरकीपासून हे बनवण्याची प्रक्रिया याच परिसरात होते. या आगीत जीवितहानी झाली नाही.
जालन्यातील मुलचंद फुलचंद कृषी उद्योग कापसाच्या जिनिंगला आग, जीवितहानी नाही - मुलचंद फुलचंद कृषी उद्योग
सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कामगार काम करत असताना सुरू झालेली ही आग हळूहळू वाढत गेली
मुलचंद फुलचंद कृषी उद्योग कापसाच्या जिनिंगला आग
सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कामगार काम करत असताना सुरू झालेली ही आग हळूहळू वाढत गेली मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अकरा वाजता लागलेल्या आगीनंतर दीड तासाने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे.