जालना - जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथे तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे एका तरुणाला चांगलेच महाग पडले आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यासह २० जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वाढदिवस साजरा करणे तरुणाला पडले महाग, २० जणांविरोधात गुन्हा दाखल - बदनापूर जालना लेटेस्ट न्युज
जिल्ह्यात जमावबंदी असतानाही बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील २३ वर्षीय सचिन सखाराम आरसुड याने आपल्या 19 मित्रासोबत मांजरगाव नदीच्या पुलावर केक कापला. तसेच भररस्त्यात मोटारसायकल लावली आणि परवानगी नसताना लोकांना देखील जमवले. इतकेच नाहीतर तलवारीने केक कापला.
बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील २३ वर्षीय सचिन सखाराम आरसुड याने आपल्या 19 मित्रासोबत मांजरगाव नदीच्या पुलावर केक कापला. तसेच भररस्त्यात मोटारसायकल लावली आणि परवानगी नसताना लोकांना देखील जमवले. इतकेच नाहीतर तलवारीने केक कापला. याबाबत पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी सखाराम आर्सुळ या तरुणासह अशोक भगवान आर्सुळ, बाबासाहेब भगवान डाके , प्रकाश पंढरीनाथ आर्सुळ, सचिन जनार्धन आर्सुळ, मुंकूद भगवान डाके, लक्ष्मण मच्छिंद्रनाथ पाझाडे, रवी बंन्सीलाल आर्सुळ, भाऊसाहेब श्रीमंत डाके, अमोल बंजरंग डाके, दिपक धुराजी आर्सुळ, साईनाथ श्रीमंत पाझाडे, संकेत प्रभाकर आर्सुळ, नाथा जमुनाजी वाकडे, महेश तुळशीराम डाके, प्रदीप नानासाहेब डाके, सतिश मधूकर कांबळे, गजानन हरीभाऊ आर्सुळ, विशाल बबन वाकडे, नितीन पांडूरंग भांड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस हेड कॉन्टेबन खंडागळे करत आहेत.