महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 7, 2020, 9:45 PM IST

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : एसटी महामंडळाच्या जालना आगाराचे 15 कोटींचे उत्पन्न बुडाले

जालना विभागाचे गेल्या चार महिन्यांमध्ये सुमारे पंधरा कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. असे असले तरी सुमारे साडेचारशे चालक आणि साडेचारशे वाहक आणि अन्य कर्मचारी अशा एकूण विभागातील 1300 कर्मचाऱ्यांना कुठलीही कपात न करता वेतन सुरू आहे.

जालना बस डेपो
जालना बस डेपो

जालना - सामान्य माणसाची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाचे लॉकडाऊनच्या काळात मोठे नुकसान होत आहे. जालना आगाराचे सुमारे पंधरा कोटींचे उत्पन्न बुडाले आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन फायदा असो वा तोटा, प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटी महामंडळाला कोरोनामुळे तोटा सहन करावा लागत आहे. जालना विभागाचे गेल्या चार महिन्यांमध्ये सुमारे पंधरा कोटींचे उत्पन्न बुडाले आहे. असे असले तरीही सुमारे साडेचारशे चालक आणि साडेचारशे वाहक आणि अन्य कर्मचारी अशा एकूण जालना विभागातील 1300 कर्मचाऱ्यांना कुठलीही कपात न करता वेतन सुरू आहे. दरम्यान, मे, जून, जुलैचा 50 टक्के पगार झाला आहे आणि उर्वरित पगारही लवकरच होणार आहे.

दर महिन्याला या तेराशे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर एसटी महामंडळाचे साडेतीन कोटी रुपये खर्च होतात. मात्र, प्रवाशांना सेवा देणे हे एकमेव ध्येय असल्याने नफा तोट्याचा विचार केला जात नाही, अशी माहिती विभागीय नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी दिली.

सध्या जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू असून 6 बस जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये जात आहेत. त्यामध्ये जाफराबाद, भोकरदन, शहागड, परतूर, मंठा, आष्टी, कुंभार पिंपळगाव, आदी गावांचा समावेश आहे. पण बसमध्ये पंचवीस प्रवासी नेण्याची तयारी असतानाही प्रवासी मिळत नसल्यामुळे बस देखील रिकाम्या जात आहेत. मात्र, आम्ही प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसच्या फेऱ्या सुरू ठेवले असल्याचे नेहुल यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details