महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोसायटी निवडणुकीत राडा; शिवसेना नेते खोतकर, काँग्रेस नेते गोरंट्याल यांचे समर्थक आमने सामने - Society Election Khotkar supporters

जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल गटात ( Khotkar Gorantyal supporters jalna) राडा झाल्याची घटना आज सकाळी जालना तालुक्यातील पानशेंद्रा ( Society Election Gorantyal supporters ) गावात घडली.

fight between between Khotkar Gorantyal supporters
सोसायटी निवडणूक गोरंट्याल गट

By

Published : Jun 19, 2022, 12:37 PM IST

जालना - जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल गटात ( Khotkar Gorantyal supporters jalna) राडा झाल्याची घटना आज सकाळी जालना तालुक्यातील पानशेंद्रा गावात घडली. पानशेंद्रा गावात विविध कार्यकारी सेवा सहकारी ( Society Election Khotkar supporters ) संस्थाच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान खोतकर समर्थक आणि गोरंट्याल समर्थक ( Society Election Gorantyal supporters ) आमने सामने आल्याने झाल्याची माहिती समोर येत आहे.

माहिती देताना माजी मंत्री खोतकर

हेही वाचा -accident Jalna Samrudhi Highway : जालना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एक जण ठार

शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेस आमदार एकाच वेळी मतदान केंद्रासमोर आल्याने कार्यकर्त्यांनी गोधळ घातला. दरम्यान यात बाचाबाची, दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होत असताना दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि त्या नंतर आक्रमक खोतकर समर्थक गटाकडून दगडफेक केल्याचा आरोप काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या समर्थकांनी केला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून खोतकर आणि गोरंट्याल गटाला ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे या दोन्ही गटांकडून या सोसायटीच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांची सरळ लढत काँग्रेस आमदार केलास गोरंट्याल यांच्याशी आहे. दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. १३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान ही बाचाबाची आणि दगडफेक झाली. दरम्यान प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राड्यानंतर या ठिकाणी सध्या शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडल्या जात आहे. दरम्यान अर्जुन खोतकर यांनी या राड्यावर प्रतिक्रिया देताना विरोधक निवडणुकीत पराभूत होणार असल्याने असले आरोप करत असल्याचे म्हटले.

हेही वाचा -Rajesh Tope : शाळेतील मुलांच्या आरोग्यावर संस्थाचालकांनी लक्ष ठेवावे - राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details