महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विमा कंपनीत शेतकऱ्यांचा 5 तास ठिय्या, लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे - अधिक्षक कृषि अधिकारी

आज भोकरदन, बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात 5 तास ठिय्या आंदोलन केले.

विमा कंपनीत शेतकऱ्यांचा 5 तास ठिय्या, लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

By

Published : Jul 17, 2019, 9:42 PM IST

जालना- जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप पर्यंतही मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी यासाठी वारंवार शासन दरबारी चकरा मारल्या, आंदोलने केली. मात्र, त्यांच्या पदरी आश्वासनाशिवाय काहीच पडले नाही. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी रास्ता रोकोही केले. त्यावेळीही शेतकऱ्यांना लेखी आश्वासनावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आज भोकरदन, बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात 5 तास ठिय्या आंदोलन केले.

विमा कंपनीत शेतकऱ्यांचा 5 तास ठिय्या, लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

पिक विमा देण्याच्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्यामुळे बदनापूर, भोकरदन तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य भागातील शेतकऱ्यांनी आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पीक विम्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा विमा त्वरित खात्यावर जमा करावा, त्याशिवाय कार्यालयाच्या बाहेर पडणार नाही, अशी भूमीका शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. मात्र, पिक विमा देणे हे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या हातात नसल्यामुळे त्यांनी विमा कंपन्यांसोबत चर्चा केली आहे. लवकरच हा विमा संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, त्यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही.

दरम्यान प्रकरण वाढल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. त्याबरोबरच अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हे देखील या कार्यालयात तळ ठोकून होते.

शेवटी कृषी अधीक्षक शिंदे आणि अप्पर पोलीस अधीक्षक पवार यांनी मोबाईलवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर विमा कंपनीने लेखी आश्वासन दिल्यानंतर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले .

आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष निवृत्ती महाराज शेवाळे, गजानन पाटील बंगाळे, युती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, युती आघाडीच्या जालना जिल्हाध्यक्ष अश्विनी सानप, अशोक बापू मुटकुळे, निवृत्ती सानप, वाल्मीक शेवाळे, गणेश बावणे, बाबासाहेब जोशी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचीची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details