महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही इम्पॅक्ट: माध्यमिक शिक्षकांच्या पगारासाठी २४ तासात मिळाले बजेट

जालना जिल्हा परिषदेतून पुणे येथील कार्यालयाला पाठवण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकात काही त्रुटी होत्या. त्यामुळे, या शिक्षकांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे पगार होऊ शकले नाही. अशात कर्ज काढून घेतलेल्या विविध वस्तूंचे हप्ते फेडण्यासाठी शिक्षकांवर पुन्हा कर्ज काढण्याची वेळ आली होती.

जिल्हा परिषद जालना
जिल्हा परिषद जालना

By

Published : Oct 20, 2020, 10:29 PM IST

जालना- जिल्हा परिषदेंतर्गत माध्यमिक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या २३५ शिक्षकांचे पगार दोन महिन्यांपासून थकित होते. यासंदर्भात काल ईटीव्ही भारतने खोलात जाऊन बातमी केली होती. ती बातमी व्हायरल होताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि आज या शिक्षकांच्या पगारांना मान्यता मिळाली आहे.

जालना जिल्हा परिषदेतून पुणे येथील कार्यालयाला पाठवण्यात येणाऱ्या अंदाजपत्रकात काही त्रुटी होत्या. त्यामुळे, या शिक्षकांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे पगार होऊ शकले नाही. अशात कर्ज काढून घेतलेल्या विविध वस्तूंचे हप्ते फेडण्यासाठी शिक्षकांवर पुन्हा कर्ज काढण्याची वेळ आली होती, त्याचा नाहक भुर्दंड त्यांना भरावा लागत होता. या सर्व प्रकाराला वैतागून शिक्षकांनी जालना जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात वारंवार चक्रा मारल्या. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

हा सर्व प्रकार जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना माहीत नव्हता. याप्रकरणी काल ईटीव्ही भारतकडून त्यांना विचारणा केली असता त्यांनी देखील आपल्याला माहीत नसल्याचे कबूल केले होते, आणि या प्रकरणात लगेच लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी वरिष्ठ कार्यालयाशी बोलून माध्यमिक शिक्षकांच्या पगाराचा रस्ता मोकळा केला आहे. शिक्षकांना देण्यात येणार्‍या पगाराच्या अंदाजपत्रकाविषयी जालना जिल्हा परिषदेला आजच आदेश प्राप्त झाला आहे.

आदेश पुढीलप्रमाणे..

शालार्थ- प्रशाला (माध्यमिक शिक्षक) माहे ऑगस्ट- २०२० वेतनदेयक अपडेट

१) जि.प. प्रशालेतील (माध्यमिक शिक्षक) लेखाशिर्षचे वेतन तरतूद आज दुपारी ३.०५ वाजता प्राप्त.

२) शिक्षक विभाग लेखा शाखेमार्फत विनाविलंब वेतन संचिका वित्त विभागातील पुढील कार्यवाहीस्तव (BDS Generation करीता) आज दुपारी ३.४० वाजता दाखल.

३) उद्या वित्तविभातील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होऊन देयके जिल्हा कोषागाराकडे दाखल केली जातील.

४) कोषागारातून देयके पारीत झाल्यानंतर व प्रत्यक्ष वेतन रक्कम कॅफोंच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर शुक्रवारी सीएमपी होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा-सोमठाणचे रेणुका माता मंदिर बंदच...मात्र भाविकांची दरबारात हजेरी

ABOUT THE AUTHOR

...view details