महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांनी रेड झोनमधून ये-जा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना घातला प्रतिबंध - कोरोनाबाधित परिसर

जिल्ह्यात होणारे हे प्रवेश रोखण्यासाठी औरंगाबाद-जालना सीमेवरील चेक पोस्ट उभे केले आणि जवळपास शंभर अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदनापूर हद्दीत प्रवेश नाकारला. तर बदनापूर तहसील कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचारी यांनाही चेतावणी देत आजचा दिवस हद्द प्रवेशाची परवानगी दिली आहे. यावर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव थांबिण्यासाठी जालना जिल्हाधिकारी बिनवडे आणि पोलीस अधीक्षक चैतन्य स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन उपाययोजना आखत आहेत.

LOCKDOWN
जिल्हाधिकाऱ्यांनी रेड झोनमधून ये-जा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना घातला प्रतिबंध

By

Published : Apr 21, 2020, 8:28 PM IST

बदनापूर(जालना) - कोरोना संकटामुळे शासन, प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. मात्र, काही अधिकारी, कर्मचारी या संकटाला गांभीर्याने न घेता मनमानी करत असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये असताना देखील अनेक अधिकारी, कर्मचारी औरगाबादमधून जालना जिल्ह्यत दररोज ये-जा करत आहेत. या बाबीची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गंभीर दखल घेतली आहे.

जिल्ह्यात होणारे हे प्रवेश रोखण्यासाठी औरंगाबाद-जालना सीमेवरील चेक पोस्ट उभे केले आणि जवळपास शंभर अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदनापूर हद्दीत प्रवेश नाकारला. तर बदनापूर तहसील कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचारी यांनाही चेतावणी देत आजचा दिवस हद्द प्रवेशाची परवानगी दिली आहे. यावर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव थांबिण्यासाठी जालना जिल्हाधिकारी बिनवडे आणि पोलीस अधीक्षक चैतन्य स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन उपाययोजना आखत आहेत.

बदनापूर, जालना येथे कार्यरत अनेक महसूल, पोलीस, आरोग्य व स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी, कर्मचारी मुख्यालय न सोडण्याचे आणि जिल्हा बंदी आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करत होते. रेड झोन असलेल्या औरंगाबाद शहरातून दररोज ते बदनापूरला ये-जा करीत आहेत. त्यामुळे बदनापूर तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना रोगाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जालना जिल्ह्यात कोरोना रोगाचा उद्रेक होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी २० एप्रिल रोजी सायंकाळी बदनापूर पोलिसांना बिनतारी संदेश पाठवला. त्यामध्ये त्यांनी औरंगाबाद-जालना सीमेवरील वरुडी चेक पोस्ट वरून औरंगाबाद शहरातून व इतर ठिकाणहून जालना जिल्ह्यात ड्युटीसाठी ये-जा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वतःचे ओळखपत्र, शासकीय ओळखपत्र आणि पासेस दाखविले तरी प्रवेश देऊ नये, किंवा आपल्या हद्दीतून जाऊ देऊ नये, असा आदेश दिला.

संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २१ एप्रिल रोजी स्वतः पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांनी चेक पोस्ट गाठून जवळपास सर्व खात्यांचे तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांची वाहने औरंगाबाद हद्दीत माघारी पाठविली. त्यामुळे अप डाऊन करणाऱ्या मंडळींचे धाबे दणाणले आहेत. यावेळी बदनापूरचे तहसीलदार, नायब तहसीलदार व काही कर्मचाऱ्यांना २१ एप्रिल रोजी सूचना देऊन आजच्या दिवस बदनापूर हद्दीत प्रवेश देण्यात आला. मात्र, या पुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रवेश नाकारला जाणार आहे. दरम्यान ज्या ठिकाणी हे चेक पोस्ट आहे तेथील नूर हॉस्पिटलमध्ये ही औरंगाबादहून जवळपास 50 ते 60 डॉक्टर व कर्मचारी ये-जा करत असून दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर जरी हे रुग्णालय असले तरी येथील कर्मचाऱ्यांनाही रेड झोनमधून ये-जा करण्यास प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details