जालना - जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 8 कैदी हे अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात असलेल्या 55 नंबरच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. हा वार्ड कैद्यांसाठी राखीव ठेवण्यात आला असून तिथे 24 तास कडक पहारा देण्यात येत आहे.
जालना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 'रॅपिड अँटीजेन टेस्ट', 8 कैदी पॉझिटिव्ह - prisoners in Jalna district Jail news
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार 31 जुलै आणि एक 1 रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 215 कैद्यांची आणि 40 अधिकारी-कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टमध्ये हे हे 8 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार 31 जुलै आणि एक 1 रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 215 कैद्यांची आणि 40 अधिकारी-कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टमध्ये हे 8 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान कोरोना आजार सुरू झाल्यापासून या कारागृहांमध्ये नवीन भरती झालेल्या कायद्यांना स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले होते. तसेच 18 तारखेपासून आलेल्या कैद्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत असलेल्या कार्यशाळेत ठेवण्यात आले आहे. जिल्हा कारागृहात 215 कैदी आहेत आणि त्यातीलच हे 8 कैदी आहेत. उर्वरित कैदी हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यशाळेत आहेत तर काही कैदी हे जिल्हा कारागृहातच आहेत.
नवीन आलेल्या कैद्यांचा कारागृहातील जुन्या कैद्यांसोबत संपर्क होऊ दिला नाही. त्यामुळे जे जुने कैदी आहेत ते आजही कोरोनापासून अलिप्त आहेत. नवीन भरती झालेल्या कैद्यांपैकीच हे 8 कैदी असल्याची माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली. जिल्हा कारागृह अधीक्षक अरुणा मुकुटराव आणि सहाय्यक अधीक्षक डी.डी. कवळे हे या कैद्यांची वारंवार तपासणी करून कोरोनाच्या आजारापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.