महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुलाच्या बांधकामामुळे 2 हजार गावकऱ्यांचा संपर्क जोडला जाणार - river

कुंडलिका नदीला पूर आल्यानंतर मानदेऊळ गावचा अन्य गावांशी असलेला संपर्क तुटायचा. या नदीवर आता पुलाचे बांधकाम होत असल्यामुळे 2 हजार गावकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पुलाच्या बांधकामामुळे 2 हजार गावकऱ्यांचा संपर्क जोडला जाणार

By

Published : Jul 15, 2019, 8:31 AM IST

जालना- बदनापूर तालुक्यातील मानदेऊळ गाव कुंडलिका नदीच्या जवळ आहे. मुख्य रस्त्याच्या दरम्यान असलेल्या या नदीला पूर आल्यानंतर या गावचा अन्य गावांसोबत असलेला संपर्क तुटत होता. या नदीवर आता पुलाचे बांधकाम होत असल्यामुळे 2 हजार गावकऱ्यांचा शहराशी संपर्कजोडला जाणार आहे.

पुलाच्या बांधकामामुळे 2 हजार गावकऱ्यांचा संपर्क जोडला जाणार

गेली अनेक वर्ष कुंडलिका नदीवर पूल नसल्यामुळे या गावचा बदनापूर, अंबड, जालना या तालुक्यांशी संपर्क तुटत होता. त्यामुळे आता मुख्य रस्त्यापासून या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आमदार नारायण कुचे यांनी केली.

बदनापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मानदेऊळगाव आणि दगडवाडी येथील विविध कामांची कुचे यांनी पाहणी केली. यासोबत जालना राजूर रस्त्यापासून ते दगडवाडीपर्यंत सुमारे दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या शुभारंभही कुचे यांच्या हस्ते झाला. या उद्घाटनानंतर त्यांनी दगडवाडी येथे गावकऱ्यांना मार्गदर्शनही केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप तालुका सरचिटणीस दीपक डोंगरे यांनी केले. मानदेऊळगाव पासून ते मुख्य रस्त्याला जोडल्या जाणाऱ्या पुलाच्या कामाचीही पाहणी त्यांनी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत तालुका अध्यक्ष वसंतराव जगताप, सरचिटणीस दीपक डोंगरे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष भगवानराव म्हात्रे, बावणे पांगरीचे सरपंच गणेशराव बावणे, दगडवाडीच्या सरपंच हिराबाई डोंगरे, शिवाजी रेजुडे, अनिल कदम, शिवाजी पवार, सुनील डोळसे, दिगंबर हिवाळेआदींची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details