जालना - कायदा कितीही कडक केला, तरी त्याच्यातून कसा पळ काढायचा हे जनताच शिकवते. अशाच प्रकारच्या एका कायद्यापासून सध्या वाहनधारक पळ काढत आहेत. यातून आपला जीव देखील धोक्यात घालत आहेत. आत्तापर्यंत झालेल्या दुचाकींच्या अपघातांमध्ये जे ठार झाले, त्या संख्येपैकी 99% वाहनधारकांचा मृत्यू हा मेंदूला मार लागल्यामुळे झाला असल्याचे उत्तरीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्या माहितीतून समोर आले. मात्र, अजूनही वाहनधारक स्वतःच्या सुरक्षेबाबत जागृत झालेले नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे. यासंदर्भात नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन अपघातावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला आणि तत्सम यंत्रणेला दिले आहेत.
'या' आहेत अपघाताच्या नोंदी -
जालना जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2020 दरम्यान 394 अपघात झाले. या अपघातांमध्ये 189 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. यात सर्वात मोठा आकडा हा दुचाकीस्वारांचा आहे. 394 अपघातामध्ये 183 लोकांचा मृत्यू झाला. त्यापैकी 109 जणांचा मृत्यू हा महामार्गावर झालेल्या अपघातामुळे झाला. तर, ग्रामीण भाग आणि शहरातील 66 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी 179 पुरुष तर 10 महिला होत्या. इतर अपघातांमध्ये 142 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यामध्ये महामार्गावरील 75 तर इतर मार्गावरील 58 व्यक्तींचा समावेश आहे. विशेष बाब सर्व 282 व्यक्ती हे पुरुषच आहेत. किरकोळ जखमी झालेल्यांमध्ये 58 व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये देखील सर्व पुरुष आहेत. अशा एकूण 394 अपघातांपैकी 217 अपघात हे महामार्गावर आणि 161 अपघात हे इतर ठिकाणी झालेले आहेत.
मृतांमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या या व्यक्तींचे प्रमाण जास्त -
अपघात झाल्यानंतर हाता पायाला इजा झाली तर माणसाचा जीव वाचू शकतो. मात्र, जर मेंदूला इजा झाली तर व्यक्तीची वाचण्याची शक्यता कमी होते. हे माहित असूनही वाहनचालक हेल्मेट न वापरता प्रवास करतात. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये हेल्मेट न घातलेल्या व्यक्तींचे प्रमाण मोठे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल -