जालना - भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नगर परिषद कार्यालयात महामानवाला अभिवादन करण्यात आले. भोकरदन नगरपरिषदेच्या महिला नगराध्यक्ष मंजूषाताई देशमुख यांनी त्यांना मिळणारे सहा महिन्यांचे मानधन (९० हजार रुपये) कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले.
भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त नगराध्यक्षांकडून मुख्यमंत्री सहायता निधीस सहा महिन्याचे मानधन - world health emergency
भोकरदन नगरपरिषदेच्या महिला नगराध्यक्ष मंजूषाताई देशमुख यांनी त्यांना मिळणारे सहा महिन्यांचे मानधन (९० हजार रुपये) आणि नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे एका दिवसाचे वेतन एकूण ५२ हजार ३४२ मुख्यमंत्री कोविड-19 सहाय्यता निधीसाठी दिले.
भोकरदन नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे एका दिवसाचे वेतन एकूण ५२ हजार ३४२ मुख्यमंत्री कोविड-19 सहायता निधीसाठी दिले. ही रक्कम उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे सोपवण्यात आली.
या वेळी, जालना जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,गटनेते संतोष अन्नदाते ,मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे नगरसेवक रमेश जाधव,श्रावणकुमार आक्से ,अभियंता किशोर ढेपले ,बबन जाधव,विश्वजित गवते,बजरंग घुलेकर अझीम शेख,समी बेग,अरिफ शेख परसराम ढोके हे उपस्थित होते.