महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विभागीय आयुक्तांनी केली ऑक्सीजन प्लांटची पाहणी

नाशिक येथील ऑक्सीजन प्लांटमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी जालना येथील कोविड हॉस्पिटलच्या ऑक्सीजन प्लांटची पाहणी केली. तसेच यंत्रणेचे कौतुकही केले आहे.

विभागीय आयुक्तांनी केली ऑक्सीजन प्लांटची पाहणी
विभागीय आयुक्तांनी केली ऑक्सीजन प्लांटची पाहणी

By

Published : May 7, 2021, 12:25 PM IST

जालना- नाशिक येथील ऑक्सीजन प्लांटमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर आता आरोग्य विभाग अधिक सतर्क झाले आहे. त्यासोबत वरिष्ठ पातळीवरील अधिकारी देखील ऑक्सीजन विषयीच्या समस्येसंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी जालना येथील कोविड हॉस्पिटलच्या ऑक्सीजन प्लांटची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. बी. बी. चव्हाण यांची उपस्थिती होती.

विभागीय आयुक्तांनी केली ऑक्सीजन प्लांटची पाहणी

दवाखान्यातून डिस्चार्ज देताना महिलेला दिल्या शुभेच्छा

ऑक्सीजन प्लांट ची पाहणी केल्यानंतर त्यांनी कोविड हॉस्पिटलचीही पाहणी केली. तसेच येथील एका 70 वर्षीय महिलेला दवाखान्यातून डिस्चार्ज देताना शुभेच्छाही दिल्या. येथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर आयुक्त केंद्रेकर यांनी येथील यंत्रणेचे तोंड भरून कौतुकही केले आहे. ते म्हणाले "या रुग्णालयाची उभारणी होत असताना देखील मी पाहणी करत होतो, आणि आजही पहात आहे. येथील यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे आणि ते चांगलं काम करत आहेत".

हेही वाचा -जमावबंदीचे उल्लंघन; नियमांचे पालन करा सांगणाऱ्या पोलिसांवर हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details