जालना - जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आर्थिक कर्ज पुरवठा करणाऱ्या ग्रामीण कुटा या संस्थेच्यावतीने जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या माध्यमातून हे वाटप होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप; ग्रामीण कुटा संस्थेचा उपक्रम
जालना जिल्ह्यामध्ये जे पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाला 100 मिलीलीटर सॅनिटायझर आणि दोन मास्क अशा पद्धतीने जिल्ह्यातील 1750 कर्मचाऱ्यांना हे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस बलाचे जवानही होते. त्यांच्याप्रमाणेच पोलीस दलातील पोलीस कर्मचारीही स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आज पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या उपस्थितीमध्ये या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
जालना जिल्ह्यामध्ये जे पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाला 100 मिलीलीटर सॅनिटायझर आणि दोन मास्क अशा पद्धतीने जिल्ह्यातील 1750 कर्मचाऱ्यांना हे मोफत वाटप करण्यात येणार आहे. ग्रामीण कुटा या संस्थेचे विभागीय व्यवस्थापक सुधीर लोणे, शाखाधिकारी माधव शिंदे, दीपक राऊत यांची यावेळी उपस्थिती होती.